बाणेर (पुणे) येथे विना प्रिस्क्रिप्शन औषध देणार्‍या विक्रेत्याला नोटीस जारी

पुणे – विना प्रिस्क्रिप्शन औषध देणार्‍या बाणेर येथील एका औषध विक्रेत्याला अन्न आणि औषध प्रशासनाने (एफ्डीए) परवाना रहित अथवा निलंबित का करू नये, अशी नोटीस जारी केली आहे.

सध्या शहरासह संपूर्ण राज्यात ऑनलाईन औषध विक्री सर्रास चालू असून त्याला रोखण्यात एफ्डीएला अपयश येत आहे. (कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर अंकुश नसणारे अन्न आणि औषध प्रशासन ! अशा अकार्यक्षम अधिकार्‍यांना जनतेने तरी का पोसायचे ? – संपादक) यासंदर्भात अद्याप संपूर्णतः धोरण घोषित करण्यात आले नाही. तरीही अनेक ऑनलाईन आस्थापनांकडून सर्रास लैंगिक, उत्तेजक, नशा, खोकला यांच्या औषधांची विक्री चालू आहे. या औषधांची विक्री करतांना आस्थापनांकडून कोणत्याही प्रकारच्या प्रिस्क्रिप्शनची निश्‍चिती केली जात नसल्याचे वारंवार आढळून आले आहे. एफ्डीएकडे याविषयी वारंवार तक्रारी करूनही त्याची नोंद घेतली जात नाही.


Multi Language |Offline reading | PDF