पूर्णा (जिल्हा परभणी) येथे फेसबूकवरून विवाहितेची अपकीर्ती करणार्‍या ४ धर्मांधांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

कपटी धर्मांध !

परभणी – पूर्णा येथील २० वर्षीय विवाहितेची फेसबूकवर अपकीर्ती करणार्‍या शेख इम्रान शेख इसाक, शेख इशरत शेख इसाक, शेख इसाक शेख मुसा, शेख वसीम शेख इसाक या ४ धर्मांधांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

महिलेने दुसर्‍या व्यक्तीसह विवाह केल्याचा राग मनात धरून हे कुकृत्य करण्यात आले होते. आरोपींनी महिलेला भ्रमणभाषवरून शिवीगाळ केली, तसेच तिच्या पतीच्या फेसबूक खात्यावर अश्‍लील भाषा वापरून ‘पोस्ट’ही केली होती. तिच्या बहिणीवरही आरोप करत अपकीर्ती केली होती. याप्रकरणी न्यायालयात तक्रार दिल्यानंतर आरोपींवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF