सेंटॉर केमिकल्स या आस्थापनाचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. श्रीकांत सावंत यांच्या भेटीच्या माध्यमातून सर्वकाही गुरुमाऊलीच करून घेतात, याची साधकाला आलेली अनुभूती

डॉ. श्रीकांत सावंत
श्री. देवदत्त कुलकर्णी

१. सेंटॉर केमिकल्स या आस्थापनाचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. श्रीकांत सावंत यांच्या भेटीची पार्श्‍वभूमी

१ अ. औद्योगिक क्षेत्रातील मित्राने त्यांचा कारखाना दाखवणे : वर्ष २००९ पर्यंत मी ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांतील दैनिकासाठी ठाणे जिल्ह्यातून विज्ञापने (जाहिराती) आणण्याची सेवा करत होतो. एकदा एका मित्राच्या मुलाच्या विवाहानिमित्त औद्योगिक क्षेत्रातील मित्रासमवेत मोठ्या तारांकित उपाहारगृहात विवाहास गेलो होतो. विवाहसमारंभास बराच अवधी असल्याने ज्यांच्यासमवेत मी गेलो होतो, ते मला म्हणाले, चला, आपणास मी आपला कारखाना दाखवतो. आम्ही त्यांचा कारखाना पाहिल्यावर बाहेर येऊन गप्पा मारत उभे होतो. तेवढ्यात औद्योगिक क्षेत्रातील एक गृहस्थ आमच्यात सामील झाले. त्यांचे नाव श्री. सावंत होते.

१ आ. दैनिक सनातन प्रभातसाठी काही विज्ञापन मिळते का ते पहावे, या विचाराने विज्ञापन मागण्यासाठी पूर्वीच्या आस्थापनामध्ये न जाता चुकून दुसर्‍याच आस्थापनात जाणे : त्यानंतर काही मासांनंतर माझ्या मनात विचार आला, श्री. सावंत यांना भेटून दैनिक सनातन प्रभातसाठी काही विज्ञापन मिळते का ते पहावे. तिथे गेल्यावर दोन आस्थापने जवळजवळ असल्याने मी चुकून सेंटॉर केमिकल्स (Centaur Chemicals) या आस्थापनामध्ये गेलो.

१ इ. आस्थापनाचे पालटलेले स्वरूप पाहून योग्य ठिकाणी आलो आहे ना ?, अशी शंका वाटणे : सुरक्षा रक्षकाकडे श्री. सावंत यांना भेटण्यासंदर्भात विचारणा केली. त्याने मला एका खोलीत बसवले. मी माझे ओळखपत्र आत पाठवले. पूर्वी मी पाहिलेल्या आस्थापनाचे स्वरूप अतिशय लहान होते आणि आता मी गेलो होतो ते आस्थापन अतिशय भव्य होते. त्यामुळे मी नेमका योग्य ठिकाणी आलो आहे ना ?, या बुचकळ्यात पडलो. सुरक्षा रक्षकाने मला आत पाठवले.

१ ई. श्री. सावंत यांना सनातन संस्था आणि दैनिक सनातन प्रभात यांविषयी पूर्ण माहिती सांगितल्यावर ते पुष्कळ प्रभावित होऊन त्यांनी संपूर्ण साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवणे : मी गेल्यावर तेथे बसलेली एक व्यक्ती मला म्हणाली, या कुलकर्णी. मी त्यांना म्हणालो, मला सावंतांना भेटायचे आहे. ते म्हणाले, मीच सावंत. मला समजेना की, मला पूर्वी भेटलेले सावंत आणि हे सावंत निराळेच आहेत. तेव्हा विचार केला, आता आलोच आहे, तर यांनाच सनातन संस्थेविषयी सर्व सांगावे. त्यांना सनातन संस्था आणि दैनिक सनातन प्रभात यांविषयी पूर्ण माहिती सांगितली. ती ऐकून ते पुष्कळ प्रभावित झाले. त्यांनी मी तुम्हाला सर्व साहाय्य करीन, असे मला सांगितले.

२. निर्मोही आणि निरहंकारी डॉ. श्रीकांत सावंत

अ. डॉ. सावंत यांना त्यांच्या श्रीमंतीचा अजिबात अहंकार नाही. त्यांना साधना सांगितल्यापासून त्यांनी लगेच नामजप करण्यास आरंभ केला.

आ. स्वतःच्या पदाचा अहंकार न बाळगता त्यांनी अगदी झोपडपट्टीत जाऊनही दैनिक सनातन प्रभातचे वितरण केले आहे.

इ. त्यांची अत्यंत साधी राहणी आहे. त्यांच्याकडे पाहून ते कोट्यधीश असतील, याची कोणाला जरासुद्धा कल्पना येणे अशक्य आहे.

ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती त्यांच्या मनात पुष्कळ भाव आहे.

उ. त्यांनी काही वर्षांपूर्वी काही मजली कार्यालय बांधले. त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी येणार्‍या पाहुण्यांना प्रत्येक वेळी ते स्वतः कार्यालय फिरून दाखवत होते. त्या कार्यक्रमाला सर्वजण आधुनिक पोशाखात होते; पण डॉ. सावंत मात्र नेहमीच्याच साध्या पोशाखात होते. ऑफिस दाखवतांना त्यांनी सगळ्यांना कोणकोणत्या जागा बसण्यासाठी दिल्या आहेत, हे सांगितले. तेव्हा आम्ही त्यांना तुम्ही कुठे बसणार ?, असे विचारले. तेव्हा त्यांनी अगदी सहजपणे इतरांना जागा देऊन राहिलेल्या कुठल्यातरी एखाद्या कोपर्‍यात बसेन, असे सांगितले.

आमच्या भेटीत पहिल्याच दिवशी त्यांनी मला दिलेला शब्द त्यांनी तंतोतंत पाळला. कधीही विज्ञापन हवे असल्यास ते त्वरित द्यायचे. त्यामुळे ते केवळ व्यावसायिक नसून आता साधक बनले असून वर्ष २०१३ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जीवनमुक्त झाले आहेत.

यावरून सर्वकाही गुरूच करून घेत असतात. आपण काहीही करत नाही, याची मला जाणीव होऊन माझा अहं न्यून होण्यास साहाय्य झाले; म्हणून म्हणतो, परात्पर गुरुमाऊली, आपण जिंकलात मी हरलो.

– श्री. देवदत्त कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF