गुरुचरणी अर्पण झाल्यावर साधकांना अनुभवायला येणारा भाव !

पू. संदीप आळशी

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी साधिका कु. भाविनी कपाडिया, सौ. नंदिनी चितळे, कु. गौरी मुद्गल आणि काही साधिका यांनी नवीन कपडे परिधान केले होते. संतांचा वाढदिवस म्हणजे आपलाच वाढदिवस आहे; म्हणून नवीन कपडे घालूया, असा त्यांचा भाव होता. माझ्या मनात नवीन कपडे घालण्याच्या संदर्भात विचार आले होते, आपण परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण झालो आहोत, मग आता आपल्यापाशी काय उरले ? परात्पर गुरु डॉक्टरांचा वाढदिवस हाच आपला वाढदिवस आहे, असा विचार करून मी नेहमीसारखेच साधे कपडे घातले.
– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (२५.११.२०१७)

 


Multi Language |Offline reading | PDF