मुक्ती आणि मोक्ष मिळण्याच्या संदर्भातील आध्यात्मिक विश्‍लेषण !

श्री. राम होनप

१. मुक्तीचे प्रकार

१. सलोक मुक्ती, २. समीप मुक्ती, ३. सरूप मुक्ती आणि ४. सायुज्य मुक्ती (मोक्ष)

२. पहिल्या तीन मुक्ती व्यष्टी साधनेने आणि चौथी मुक्ती (मोक्ष) समष्टी साधनेने लवकर साध्य होणे

पहिल्या तीन मुक्ती या सगुण-निर्गुण तत्त्वाशी आणि चौथी मुक्ती ही निर्गुण तत्त्वाशी संबंधित आहे. पहिल्या तीन अवस्था या व्यष्टी साधनेने प्राप्त करता येतात, म्हणजे आध्यात्मिक पातळी ९० टक्क्यांपर्यंत पोहोचता येते; परंतु शेवटची अवस्था ही पूर्णतः निर्गुण आहे.

समष्टी साधना ही निर्गुण तत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे समष्टी साधनेने चौथी अवस्था लवकर साध्य होते. जिवाची खर्‍या अर्थाने समष्टी साधना आध्यात्मिक पातळी ९० टक्क्यांच्या पुढे अस्तित्वाने चालू होते.

३. व्यष्टी साधना आणि मोक्षप्राप्ती

युगारंभापासून ते आतापर्यंत अब्जावधी जिवांचा जन्म आणि मृत्यू झाला. त्यांपैकी ज्या भक्तांनी समष्टी साधना केली नाही, ते जीव अजून मोक्षाला गेले नाही का ? तर तेही मोक्षाला गेले; परंतु अशा जिवांना मोक्षप्राप्तीसाठी समष्टी साधना करणार्‍यांच्या तुलनेत अधिक काळ साधना करावी लागली.

४. व्यष्टी साधना करणार्‍या जिवांना मोक्षप्राप्तीसाठीचे मार्ग

४ अ. समष्टी साधना आत्मसात करणे : ज्या जिवांना लवकर मोक्ष साध्य करावयाचा आहे, त्यांनी समष्टी साधना केल्यास त्यांना निर्गुण तत्त्वाची उपासना लवकर साध्य होऊन मोक्षापर्यंत जाता येते.

४ आ. दीर्घकाळ साधना करणे : बहुतेक जिवांना व्यष्टी साधनेतून समष्टी साधनेत प्रवेश करणे अवघड जाते. त्यामुळे त्यांचा समष्टी साधनेकडे कल नसतो. अशा जिवांना समष्टी साधनेच्या तुलनेत
अधिक काळ साधना करून मोक्षाची अवस्था साध्य करता येते.

५. ९० टक्के अध्यात्मिक पातळीनंतर व्यष्टी आणि समष्टी साधना करणाऱ्या जिवांना मोक्षप्राप्तीसाठी लागणारा कालावधी

६. दीर्घकाळ तपश्‍चर्या करणार्‍या ऋषींना मोक्ष मिळण्यासाठी लागणारा कालावधी

त्रेतायुगात सहस्र वर्षे तपश्‍चर्या करणार्‍या ऋषींना आध्यात्मिक पातळी ९० टक्के, म्हणजे व्यष्टी साधना पूर्ण करण्यास ३०० वर्षे लागत आणि समष्टी साधनेचा टप्पा पूर्ण करण्यास ७०० वर्षांचा कालावधी लागत होता.

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, गोवा. (१०.६.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF