निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याविषयी मतदाराने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र !

श्री. विजय वर्तक

मा. मुख्यमंत्री,

महाराष्ट्र शासन,

मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक असून भाजपशी एकनिष्ठ असणारा मतदार आहे. आता मी सनातनशी एकनिष्ठ असणारा साधक आहे.

आजार बरा न झाल्यास आपण आधुनिक वैद्य पालटतो. त्याप्रमाणे काँग्रेसने आपले भले केले नाही; म्हणून जनतेने आपल्या पक्षावर विश्‍वास ठेवला. तेव्हा महोदय, आता आम्ही काँग्रेसपेक्षा वेगळे आहोत, हे सिद्ध करण्याचे दायित्व आपले आहे.

सामान्य जनता भ्रष्टाचाराची दुःखे भोगत आहे. भाजप या पक्षाला निश्‍चितच भ्रष्टाचार हा शिष्टाचार हे तत्त्व आवडणार नाही. शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार शोधून काढण्यासाठी जनतेला सहभागी करून घेतले, तर शासनाच्या राज्यकारभारात निश्‍चित सुधारणा होईल आणि राज्यकारभार करणेही सोपे जाईल.

आपल्या पक्षाने जनतेला दिलेल्या वचनांची पूर्ती केली नाही, तर जनतेच्या हृदयातील जनार्दन आपल्याला क्षमा करणार नाही.

– श्री. विजय (नाना) विष्णु वर्तक, नागोठणे, रायगड. (९.०९.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF