हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने विविध सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावावे !

सर्वत्रचे धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांना धर्मसेवेची सुवर्णसंधी !

धर्मनिरपेक्ष लोकशाही नव्हे, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हाच हिंदूंच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवरील एकमेव उपाय आहे. या संदर्भात हिंदूंमध्ये व्यापक जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये धर्मजागृती सभांचे आयोजन केले जात आहे. सभेच्या माध्यमातून खालील धर्मसेवांमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी वाचक, हितचिंतक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना लाभत आहे.

१. हिंदु धर्मजागृती सभेसाठी स्वतःचे अथवा परिचितांचे सभागृह किंवा मैदान उपलब्ध करून देणे

२. धर्मप्रसाराच्या अंतर्गत बैठकांसाठी स्वतःचे अथवा परिचितांचे सभागृह अथवा तत्सम ठिकाण उपलब्ध करून देणे

३. सभेच्या प्रसारासाठी स्वतःची अथवा परिचितांची बस किंवा चारचाकी वाहन उपलब्ध करून देणे

४. सभेचा प्रसार, तसेच अन्य सेवा यांकरता वापरण्यात येणार्‍या वाहनांसाठी इंधन प्रायोजित करणे

५. धर्मदान आणि निधीसंकलन करण्यास साहाय्य करणे

६. प्रतिदिन किंवा आठवड्यातून काही दिवस सभेच्या प्रसारासाठी स्वतः वेळ देणे

७. विविध विभागांत, वसाहतींमध्ये, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या घरी किंवा कार्यालयात बैठकांचे आयोजन करणे

८. सभेचे होर्डिंग, फलक, पोस्टर, पत्रके आदी प्रसारसाहित्य प्रायोजित करणे अथवा ते वितरण करण्यासाठी साहाय्य करणे

९. स्वतःच्या घरी, कार्यालयात, वाहनांवर, तसेच मोक्याच्या ठिकाणी सभेचे होर्डिंग, फलक, पोस्टर आणि पत्रक लावून प्रसार करणे

१०. फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप आणि लघुसंदेश यांद्वारे सभेचा प्रसार करणे (कृपया फेसबूक आयडी आणि भ्रमणभाष क्रमांक कळवावा.)

११. सभेच्या संदर्भात अन्य वृत्तपत्रांमधून लेख लिहून, तसेच वृत्तवाहिन्यांद्वारे (केबल मिडीयाद्वारे) प्रसिद्धी देणेे

१२. सभेच्या सेवेत असलेल्या कार्यकर्त्यांची भोजन आणि निवास व्यवस्था करणे

१३. सभेच्या मैदानातील प्रत्यक्ष सिद्धतेतील सेवांमध्ये (कमानी लावणे, प्रदर्शन आणि अन्य कक्ष उभारणे यांत) सहभागी होणे

अन्य कोणत्याही माध्यमांतून साहाय्य करू शकत असल्यास तसेही कळवावे.

या सेवांमध्ये सहभागी होऊ शकणार्‍या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी व्यक्तींनी स्वतःचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक अन् संगणकीय पत्ता आदी माहिती, तसेच वरील कोणत्या सेवांमध्ये आपण सहभागी होऊ शकतो ? याविषयीची माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर किंवा टपालाने पाठवावी. संगणकीय पत्ता नसल्यास श्री. शिवाजी वटकर यांना ९३२२५३३५९५ या क्रमांकावर कळवावे.

(टपालासाठी पत्ता : श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, १०७, सनातन संकुल, देवद, पोस्ट – ओ.एन्.जी.सी. तालुका – पनवेल, जिल्हा – रायगड ४१०२२१)


Multi Language |Offline reading | PDF