जळगाव धर्मसभा विशेष – सभेतील वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे !

मशाल घेऊन झालेले धर्मविरांचे आगमन
ढोल-ताशांसमवेत युवकांचा सहभाग
हिंदु धर्मजागृती सभेच्या वातावरणात ब्रह्मवृंदांकडून वेदमंत्र निनादला । संत, मान्यवरांच्या उपस्थितीत सभारूपी धर्मयज्ञास आरंभ झाला ॥

 

शंखनादाचा हुंकार घुमला ।

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रप्रेमी प्रा. रामेश्‍वर मिश्र नतमस्तक झाले !

 

‘हिंदु’ म्हणून धर्माभिमान जागवला । हिंदुत्वाची खूण म्हणून मस्तकी टिळा लावला ।

 

बालमने देती संदेश धर्म आणि संस्कृती यांचे पालन करण्याचा । चला हिंदूंनो, जपूया वारसा देशाच्या आध्यात्मिकतेचा ॥

 

१८ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती

 

पांडववाड्यासारखा ऐतिहासिक वारसा लाभलेली जळगावनगरी !

जळगाव शहरापासून २७ कि.मी. अंतरावर एरंडोल हे तालुक्याचे गाव आहे. हे गाव म्हणजे महाभारतकालीन एकचक्रनगरी ! महाभारताच्या आधी पांडव अज्ञातवासात असतांना ते याच एकचक्रानगरीमध्ये वास्तव्यास होते. ते ज्या वाड्यात राहिले, तो वाडा म्हणजे पांडववाडा ! आजही एरंडोलमध्ये ऐतिहासिक वास्तू म्हणून पांडववाडा प्रसिद्ध आहे. एरंडोलपासून १५ किलोमीटरवर असलेल्या पद्मालय येथे भीमाने बकासुराचा वध केला. एरंडोल येथे भीमाची वाटी अजूनही दिसते. वाड्याच्या जवळील विहिरीला द्रौपदीकूप म्हणतात. या महाभारतकालीन पांडववाड्याचा शासकीय गॅझेटमध्ये (राजपत्रामध्ये) पांडववाडा असा उल्लेेख आहे. वाड्याच्या शेजारी धर्मशाळा आहे. असे केवळ हिंदू मंदिरांच्या शेजारीच आढळते. – श्री. सुनील घनवट,  महाराष्ट्र राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

 


Multi Language |Offline reading | PDF