तेजप्रताप यादव यांच्या कानशिलात लगावणार्‍यास भाजप नेता १ कोटी रुपये देणार

  • बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्यामुळे अशा एकमेकांना मारहाण करण्याच्या उघड धमक्या दिल्या जात आहेत !
  • राजदच्या नेत्यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या म्हणून त्यांचेच अनुकरण करणे भाजपच्या नेत्यांना शोभत नाही !

पाटलीपुत्र – बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना ‘घरात घुसून मारू’, अशी धमकी देणारे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांना आता भाजपच्या नेत्याने प्रत्युत्तरात धमकी दिली आहे. भाजपचे नेते अनिल साहनी यांनी म्हटले आहे की, ‘तेजप्रताप यादव यांच्या कानशिलात जो कोणी लगावेल, त्याला एक कोटी रुपये देण्यात येतील.’


Multi Language |Offline reading | PDF