सांगली येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेचा विनयभंग करणार्‍या आरोपीवर गुन्हा प्रविष्ट

वासनांधतेची परिसीमा !

सांगली, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – सांगली-कोल्हापूर राज्य महामार्गावरील रजपूत इंग्लिश स्कूलमध्ये साडेतीन वर्षांच्या बालिकेचा विनयभंग करण्यात आला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात १५ दिवसांनंतर झाली. या प्रकरणातील संशयित आरोपी उत्तम हिंगमिरे (वय ४२ वर्षे) हा मुलीच्याच शाळेत रोजंदारीवर काम करतो. त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात उपस्थित केले असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी गेल्यावर प्रथम तक्रार नोंदवून घेण्यास सांगली पोलिसांनी टाळाटाळ केली. (कर्तव्यचुकार पोलीस ! – संपादक) शेवटी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF