(म्हणे) बिहारमध्ये नरेंद्र मोदी यांचे हात तोडणारे अनेक जण आहेत ! – बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी

राबडीदेवी आणि त्यांचे पती लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री असतांना बिहारमध्ये जंगलराज का होते, हे या धमकीतून लक्षात येते !

पाटलीपुत्र – धाडस असेल, तर तुम्ही हात तोडून दाखवाच, बिहारमध्ये नरेंद्र मोदी यांचे हात तोडणारे अनेक जण आहेत, अशा शब्दांत बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांना प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवणार्‍यांचे हात तोडू अशी धमकी दिल्यानंतर त्याविषयी बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार नित्यानंद राय यांनी क्षमा मागितली होती. (भाजपचे असे खासदार कधीतरी रामराज्य (सात्त्विक राज्य) देऊ शकतात का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF