भारतात प्रतिवर्षी ४५ सहस्र महिलांचा प्रसुतीच्या वेळी मृत्यू

स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत एवढ्या मोठ्या संख्येत महिलांचा मृत्यू होणे देशाला लज्जास्पद आहे !

मुंबई – भारतात प्रतिवर्षी ४५ सहस्र महिलांचा प्रसुतीच्या वेळी मृत्यू होतो. प्रसुतीच्या वेळी उद्भवणार्‍या आरोग्याच्या समस्यांमुळे महिलांना प्राण गमवावे लागले आहेत, असे ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्टेरिक अ‍ॅण्ड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ने आयोजित केलेल्या परिषदेत नमूद करण्यात आले. गर्भवती महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असून त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत या परिषदेत व्यक्त करण्यात आले. (महिलांचा प्रसुतीच्या वेळी मृत्यू होणे हे आतापर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांना लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)

या परिषदेत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आदींसह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या प्रसुतीच्या कालावधीतील आरोग्य समस्या सोडवण्यासाठी ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्टेरिक अ‍ॅण्ड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’द्वारे ‘मान्यता’ ही नवी मोहीम चालू करण्यात येणार आहे. या वेळी बोलतांना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,‘‘ही मोहीम महत्त्वाची असून गरोदर महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नवीन सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालू आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF