सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांना समष्टी साधनेच्या संदर्भात सुचलेली सूत्रे

सौ. सौम्या कुदरवळ्ळी

‘साधनेत समष्टी साधनेला ७० प्रतिशत महत्त्व आहे. समष्टी साधना करणार्‍या साधकांनी पुढील काही सूत्रे लक्षात ठेवल्यास त्यांची साधना चांगली होईल, असे वाटते.

१. समष्टी साधनेत कोणत्याही विषयामुळे गोंधळ होऊ नये, यासाठी सर्व विषयांत स्पष्ट, प्रामाणिक आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे.

२. प्रत्येक क्षणी वर्तमानकाळात रहाता येणे आवश्यक आहे.

३. कोणत्याही विषयाची एकांगी माहिती घेऊन त्यातून निष्कर्ष काढू नये. त्यासाठी सत्य आणि असत्य यांविषयी जाणून घेऊनच निर्णय घेणे आवश्यक आहे.

४. समष्टीचे मत घेऊन आणि इतरांना साहाय्य करून प्रयत्न करावेत.

५. स्वेच्छेचा त्याग करून परेच्छेने विचार आणि कृती करावी. तीच ईश्‍वरेच्छाही असते.

६. समष्टी साधनेत समष्टीकडून व्यावहारिक लाभ आणि सुख यांची अपेक्षा न करता समष्टीचे सुख अन् आनंद यांसाठी सतत कृती करणे अपेक्षित असते. त्यामुळेच आनंद मिळतो.

७. समष्टी साधनेत न्यूनपणा घेणे, हे मोठे शस्त्र आहे.

८. इतरांना सतत प्रोत्साहित करावे.

९. आपल्याच मतावर ठाम असणे, स्वतःच्या चुका लपवणे, चुका न स्वीकारणे, प्रतिमा जोपासणे, इतरांचे श्रेय आपण घेणे, इतरांचे कौतुक न करणे, समष्टीत झालेल्या चुका स्वतःकडे न घेता इतरांवर ढकलणे, वेळोवेळी समष्टीत होणार्‍या चुका न सांगणे आणि इतरांना मानसिक पातळीवर सांभाळणे, हे समष्टी साधनेतील सर्वांत मोठे स्वभावदोष आहेत. या स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी प्राधान्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

१०. समष्टी हे ईश्‍वराचे व्यापक रूप आहे. समष्टी साधनेत आपली सूक्ष्म साधना होते. ईश्‍वराच्या या नियोजनात आपण सतत शिकण्याच्या स्थितीत राहून समष्टीचा आनंद घेतला पाहिजे.

समष्टी साधनेसाठी आवश्यक गुण

निरपेक्ष प्रेम, इतरांचा विचार करणे, इतरांना साहाय्य करणे, आध्यात्मिक नात्याने वागणे, सकारात्मक विचार करणे, शिकण्याची वृत्ती ठेवणे इत्यादी.’

– सौ. सौम्या कुदरवळ्ळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.२.२०१६)