साधकांनो, स्वयंसूचना सत्र करतांना मनात अनावश्यक विचार येत असल्यास मोठ्या आवाजात (पुटपुटत) सत्र करून जलद गतीने अंतर्शुद्धी करून घ्या !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘स्वयंसूचनांची सत्रे करत असतांना मनातील निरर्थक विचारांमुळे सत्र एकाग्रतेने होत नाही’, असे अनेक साधक सांगतात. त्यामुळे सूचनांचा अंतर्मनावर संस्कार न झाल्याने स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता न्यून होत नाही अन् साधनेतील अमूल्य वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी मनात अनावश्यक विचार येत असल्यास स्वयंसूचना सत्र थोड्या मोठ्या आवाजात (पुटपुटत) करू शकतो. यामुळे विचारांकडे लक्ष न जाता ते आपोआपच न्यून होतील आणि स्वयंसूचनेचे सत्र परिणामकारकरित्या होईल. मोठ्या आवाजात सत्र करतांना इतरांना व्यत्यय येणार नाही, याची काळजी घ्यावी.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.११.२०१७)