स्वर्ग उतरला या वसुंधरेवर ।

स्वर्ग उतरला या वसुंधरेवर ।

करा हो सारे साधनेचा निर्धार ॥ १ ॥

रामनाथी आश्रम आहे आपला आधार ।

येथे आहे गुरुकृपेचा महासागर ॥ २ ॥

विश्‍वकुटुंबाचा करितो प्रसार ।

या हो या कुटुंबात, नका करू विचार ॥ ३ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांचा महिमा अपरंपार ।

तुमचा भवसागर होईल पार ॥ ४ ॥

कधी असतो साधनेचा आढावा, तर कधी सत्संग ।

कधी असतो भाववृद्धी सत्संग, तर कधी संतसत्संग ॥ ५ ॥

नामस्मरणाने रचली साधनेची वीट ।

प्रार्थना, कृतज्ञता अन् व्यष्टी-समष्टीची गोडी अवीट ॥ ६ ॥

– सौ. नीलिमा सप्तर्षी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now