अश्‍लील हावभाव करत शरीरसुखाची मागणी करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा वासनांधाला जन्माची अद्दल घडेल, असे कठोर शासन केले पाहिजे !

मुंबई – दूरभाषवर संभाषण करत असलेल्या विवाहित महिलेच्या जवळ येऊन अश्‍लील हावभाव करत तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करणार्‍या शमशुद्दीन पाईल या वासनांधाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. कुलाबा परिसरातील  इमारतीच्या ज्या मजल्यावर पिडित महिला रहाते त्याच मजल्यावर एक ‘टुरिस्ट टॅक्सी’चे कार्यालय आहे. शमशुद्दीन हा त्या ठिकाणी चालक म्हणून कामाला आहे. शमशुद्दीनच्या कृत्याने भयभीत झालेल्या पिडीत महिलेने तिच्या पतीला याविषयी सांगितल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा शमशुद्दीन याला पोलिसांनी अटक केली.


Multi Language |Offline reading | PDF