भारतातील डॉक्टर रुग्णांना तपासण्यासाठी सरासरी २ मिनिटेच देतात ! – सर्वेक्षण

समाज साधना आणि धर्माचरण करत नसल्यामुळे सर्वत्र रज-तम वाढून आजारांचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे, तसेच बहुतांश डॉक्टर हे केवळ व्यवसाय म्हणून रुग्ण तपासणी करतात. ही स्थिती पालटण्यासाठी शासनकर्त्यांनी समाजाला साधना आणि धर्माचरण शिकवण्याला पर्याय नाही !

रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरे डॉक्टर यांचा परिणाम

नवी देहली – भारतातील डॉक्टर किंवा ‘प्रायमरी केअर कन्सल्टंट’ रुग्णांना तपासण्यासाठी सरासरी २ मिनिटेच देतात, असे एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातून समोर आले आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश येथील स्थिती यापेक्षाही वाईट आहे. तेथे केवळ ४८ सेकंद ते १ मिनिट ३ सेकंदांपर्यंतच वेळ दिला जातो. मेडिकल जर्नल ‘बीएम्जे ओपन’मध्ये हे सर्वेक्षण प्रकाशित करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण ब्रिटनमधील एका रुग्णालयांतील संशोधकांनी केले आहे. अमेरिका, स्वीडन आणि नॉर्वे यांसारख्या देशांमध्ये ही वेळ २० मिनिटांपर्यंत आहे.

१. या जर्नलमध्ये म्हटले आहे की, जगातील १८ असे देश आहेत की, तेथे जगातील ५० टक्के लोकसंख्या आहे आणि तेथे रुग्णांना तपासण्यासाठी सरासरी ५ मिनिटे दिली जातात. तपासणीसाठी इतका अल्प वेळ देणे रुग्णांसाठी चिंताजनक आहे. तसेच याद्वारे डॉक्टरांवरील कामाचा ताणही दिसून येतो.
२. अनेक रुग्ण प्रतिजैविके (अ‍ॅन्टीबायोटिक) घेतात किंवा मेडिकलमधून गोळ्या घेतात, असेही या अभ्यासाद्वारे लक्षात आले आहे.
३. यासंदर्भात भारतातील तज्ञांनी सांगितले की, येथे रुग्णालयांमधील गर्दी आणि डॉक्टरांची अपुरी संख्या यांमुळे ही स्थिती आहे. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागामध्ये (ओपीडीमध्ये) डॉक्टर एकाच वेळी २-३ रुग्णांना तपासत असतात. खाजगी रुग्णालयांमध्ये किंवा चिकित्सालयामध्ये अशीच स्थिती आहे. येथे डॉक्टर केवळ आजाराची लक्षणे विचारतात आणि रुग्णांना औषधे देतात. प्रत्यक्षात शारीरिक तपासणी होतेच असे नाही.


Multi Language |Offline reading | PDF