हिंदूबहुल भारतात हिंदूंची गळचेपी करणारी कौसरनाग (काश्मीर) यात्रेवरील सरकारी बंदी !

हिंदु वस्त्यांमध्ये मुसलमानांना घर नाकारल्यावर गळे काढणारे तथाकथित सर्वधर्मसमभावी, पुरो(अधो)गामी आदी मंडळी काश्मिरी मुसलमानांच्या या उन्मत्तपणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

हिंदूबहुल भारतात हिंदूंची गळचेपी होते आणि त्यांच्या धार्मिक भावनांचा अनादर केला जातो. असे म्हणा की, त्यांच्या धार्मिक भावना निर्दयतेने पायदळी तुडवल्या जातात. हिंदूंनी प्राणपणाने विरोध करूनही कर्नाटकच्या काँग्रेसी सरकारने हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची सरकारी पातळीवर जयंती साजरी करणे, हे सध्याचे ताजे उदाहरण ! स्वतंत्र भारताच्या ७ दशकांच्या इतिहासात अशी असंख्य उदाहरणे मिळतील. केंद्रात कोणाचेही सरकार येवो, हिंदूंवर अन्याय ठरलेलाच ! ‘हिन्दू सभा वार्ता’ या हिंदी साप्ताहिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या काश्मीरमधील कौसरनाग यात्रेवरील बंदीच्या रूपात हिंदूंवर झालेल्या अन्यायाचा लेख आमच्या वाचकांसाठी येथे साभार प्रसिद्ध करत आहोत.

कौसरनाग यात्रेला जाणारे हिंदु भाविक

१. काश्मीरमधील ‘कौसरनाग’चे आध्यात्मिक महत्त्व

‘काश्मीर घाटीतील कुलगाम जिल्ह्यामध्ये कौसर किंवा कोणसर नाग सरोवर आहे. काश्मीर खोर्‍याला ‘नागभूमी’ असेही म्हटले जाते. त्यामुळे खोर्‍यातील अनेक तीर्थस्थळांची नावे ‘नाग’ या शब्दाशी मिळती-जुळती आहेत. हे सरोवर जवळ-जवळ २ मैल लांब आणि अर्धा मैल रूंद आहे. पांचाळ शृंखलेत असलेले हे सरोवर समुद्राच्या तळापासून जवळ-जवळ ४ किलोमीटर (४ सहस्र मीटर) उंचीवर आहे. हे तीर्थस्थळ ‘विष्णुपाद’ नावानेही ओळखले जाते. असे म्हटले जाते की, या ठिकाणी भगवान विष्णूची पदचिन्हे आहेत.

२. कौसरनाग तीर्थयात्रेवर सरकारी बंदी !

साक्षात् श्रीविष्णूशी संबंधित असल्या कारणाने हे स्थान हिंदूंसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. जुलै मासामध्ये या तीर्थक्षेत्री पूजाअर्चा करण्यासाठी काश्मिरी हिंदू एकत्र येत असत. देशाच्या अन्य भागांतूनही भाविक हिंदू थोड्या प्रमाणात या तीर्थयात्रेसाठी येत; परंतु आता या सर्व जुन्या आठवणी म्हणूनच राहिल्या आहेत. जेव्हापासून काश्मीर खोर्‍यावर आतंकवाद्यांचा प्रभाव वाढला आणि तेथील राज्य सरकारने आतंकवाद्यांसमोर योजना अथवा असमर्थता यांमुळे आत्मसमर्पण केले, तेव्हापासून ही तीर्थयात्रा बंद पडली.

३. मूठभर हिंदूंच्या तीर्थयात्रेवर गदा आणण्यासाठी प्रयत्नशील फुटीरतावादी !

वर्ष २०१४ च्या जुलै मासामध्ये २५ ते ३० काश्मिरी हिंदूंनी कौसरनाग सरोवरावर पोहोचून पूजाअर्चा करण्याचा निर्णय घेतला. खरेतर पूजाअर्चा करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारची अनुमती घेण्याची आवश्यकता नव्हती; परंतु खोर्‍यातील आतंकवाद्यांचा प्रभाव पहाता स्वत:च्या संरक्षणासाठी त्यांनी राज्य सरकारची अनुमती प्राप्त केली. जसे तीर्थयात्री पूजाअर्चा करण्यासाठी कौसरनागच्या दिशेने मार्गस्थ झाले, तसे फुटीरतावाद आणि जिहादी आतंकवाद यांच्याशी मिळत्या-जुळत्या प्रभावाचे प्रतिनिधित्व करणार्‍या ‘हुर्रियत कॉन्फरन्स’ या संघटनेने याला केवळ विरोधच केला नाही, तर ‘काश्मीर बंद’चे आवाहन केले. या आवाहनामध्ये खोर्‍यातील ‘बार असोसिएशन’ ही सहभागी झाली होती ! या वातावरणामुळे श्रीनगरच्या काही भागातील दुकाने बंद राहिली.

४. (म्हणे) ‘कौसरनाग यात्रा म्हणजे काश्मीर खोर्‍यावर हिंदूंचे सांस्कृतिक आक्रमण !’

आता सर्वांत मोठे आश्‍चर्य प्रकट होणार होते. यात्रेच्या विरोधात तर्क देतांना ‘हुर्रियत कॉन्फरन्स’च्या नेत्यांनी (ज्यामध्ये बहुतांश सैय्यद आहेत) असे सांगितले की, यात्रेचा हा प्रवास खोर्‍यातील लोकसंख्या अनुपात (Population Demography) पालटण्याचे षड्यंत्र आहे. हे लोक खोर्‍यातील हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ही यात्रा म्हणजे काश्मीर खोर्‍यावर हिंदूंचे सांस्कृतिक आक्रमण आहे. काही मूठभर हिंदू कौसरनाग येथे पोहोचून पूजाअर्चा करतात, तर हे हिंदूंचे सांस्कृतिक आक्रमण कसे ?

५. हिंदुविरोधी जम्मू-काश्मीर सरकार !

कौसरनाग येथे तीर्थयात्रेला जाणार्‍या त्या २५-३० यात्रेकरूंच्या मनात तरीही अशी आशा कायम होती की, फुटीरतावाद्यांनी केलेल्या बाष्कळ बडबडीच्या विरोधात आणि त्यांच्या हिंदुविरोधी प्रयत्नांचे राज्य सरकार खंडन करील आणि मोडून काढेल; परंतु आश्‍चर्य म्हणजे जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी फुटीरतावाद्यांची क्षमायाचना केली ! मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आम्ही तर कौसरनाग यात्रेला अनुमती दिलीच नव्हती !’’ ते एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी या यात्रेवर थेट बंदीच घातली !’

– डॉ. कुलदीप चंद अग्निहोत्री (संदर्भ : ‘साप्ताहिक हिन्दू सभा वार्ता’, २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१४)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now