हज यात्रेकरूंच्या संदर्भातील माहिती गोळा करण्याचे कंत्राट सौदी अरेबियाने भारतीय आस्थापनाला दिल्याने पाकला चिंता

केवळ माहिती गोळा करण्याच्या कंत्राटावरून चिंता करणारा पाक भारतात गेली ३ दशके आतंकवादी कारवाया करत असल्याने भारतीय चिंतेत असतात, हे त्याला कधी कळणार ?

इस्लामाबाद – सौदी अरेबियाने हज आणि उमराह यात्रेसाठी येणार्‍या ‘बायोमेट्रिक’ पडताळणी करण्याचे कंत्राट ‘एतिमाद’ या भारतीय आस्थापनाला दिले आहे. हे आस्थापन दुबई येथून कार्य करते. ३ नोव्हेंबरपासून या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. भारतीय आस्थापनाला कंत्राट मिळाल्यामुळे पाकच्या नागरिकांची माहिती भारताला मिळेल, अशी चिंता पाकला लागल्याने नदीम शेख या नागरिकाने पाकच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यात शेख यांनी म्हटले आहे की, पाक नागरिकांची माहिती भारताकडे गेल्यास पाकच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

इजिप्त, इराण, भारत आणि बांगलादेश यांनी त्यांच्या यात्रेकरूंची बायोमेट्रिक पडताळणी करण्यास आधीच नकार दिला आहे. पाकिस्तानच्या जमात-ए-इस्लामी पक्षाचे प्रवक्ता मियां मकसूद अहमद यांनी काही दिवसांपूर्वी याचा विरोध केला होता. ते म्हणाले होते की, केवळ पाकच्याच नागरिकांची बायोमेट्रिक पडताळणी केली जाते. (पाकच्या नागरिकांवर जगातील कोणत्याच देशाचा विश्‍वास नसल्याने ही स्थिती आहेत, हे पाकला कळेल तो सुदिन ! – संपादक)