मणीपूरमधील चंदेल येथील बॉम्बस्फोटात २ सैनिक हुतात्मा

सैनिकांचा नाहक बळी जाऊ देणारा जगातील एकमेव देश भारत !

इंफाल (मणिपूर) – भारत आणि म्यानमार सीमेजवळील मणीपूरच्या चंदेल जिल्ह्यामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ‘१८ आसाम रायफल्स’चे २ सैनिक हुतात्मा झाले, तर अन्य ६ घायाळ झाले. हा स्फोट जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयाजवळ सकाळी ६ वाजता झाला. रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या या बॉम्बचा स्फोट रिमोट कंट्रोलने करण्यात आला. इंद्र सिंह यांचा जागेवरच, तर सोहनलाल यांचा काही घंट्यांनंतर मृत्यू झाला. या स्फोटाचे दायित्व अद्याप कोणीही घेतलेले नाही.