ब्रिटनच्या भारतीय वंशाच्या मंत्री प्रीती पटेल यांचे त्यागपत्र

लंडन – ऑगस्ट मासात इस्रायलमध्ये सुट्टीसाठी गेलेल्या भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी त्यांच्या खात्याला कोणतीही माहिती न देता इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्यासह त्या देशाच्या अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यामुळे त्यांना त्यागपत्र द्यावे लागले आहे. आफ्रिका दौर्‍यावर असलेल्या प्रीती पटेल यांना पंतप्रधान थेरेसा मे यांनी तडकाफडकी परत बोलावले होते. थेरेसा यांची भेट घेतल्यानंतर पटेल यांनी त्यागपत्राची घोषणा केली.