ब्रिटनमध्ये अश्‍लील संकेतस्थळे पहाण्यावर निर्बंध येणार

ब्रिटनला जे करावेसे वाटते, ते भारत सरकार कधी करणार ?

लंडन – ब्रिटनमध्ये येत्या वर्षात १८ वर्षांखालील कोणाही व्यक्तीने अश्‍लील चित्रपट पाहू नये, यासाठी नियम करण्यात येणार आहे. ‘डिजिटल इकॉनॉमी अ‍ॅक्ट’नुसार अश्‍लील संकेतस्थळे पहाण्यापूर्वी संबंधिताला त्याची वैयक्तिक माहिती द्यावी लागणार आहे. तसेच अश्‍लील संकेतस्थळ अशी माहिती घेत नसेल, ते संकेतस्थळ बंद करण्यात येणार आहे. अश्‍लील संकेतस्थळावर स्वत:ची माहिती देणे घातक असल्याची प्रतिक्रिया तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. ‘हॅकर्सच्या हाती अशी माहिती लागली, तर ती संबंधित व्यक्ती धोक्यात येऊ शकते’, असे त्यांनी म्हटले आहे.