अनेक वर्षे सनातन संस्थेच्या संपर्कात असूनही साधना नीट समजून न घेता साधकांमध्ये विकल्प पसरवून गुरुकार्याची हानी करणारा एक अहंभावी कार्यकर्ता !

‘एका जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याकडून काही संताचे नाव घेऊन चुकीची माहिती सांगतांना स्वतःची प्रौढी मिरवणे, साधकांना अयोग्य दृष्टीकोन देणे, साधकांमध्ये विकल्प पसरवणे, स्वतःच्या मनाने एखादा उपक्रम ठरवणे आणि साधकांना त्यात सहभागी करून घेणे इत्यादी प्रकारचे अयोग्य वर्तन होत असल्याचे लक्षात आले. त्या कार्यकर्त्याकडून होत असलेल्या अक्षम्य चुका पुढे देत आहे.

१. कार्यकर्त्याने स्वतःच्या मनाने केलेल्या काही कृती !

हा कार्यकर्ता आणि त्याची पत्नी सनातन संस्थेने आयोजित केलेल्या जिल्ह्यातील कोणत्याही सेवांमध्ये सहभागी होत नाहीत; परंतु हा कार्यकर्ता स्वतःच्या मनाने विविध उपक्रम ठरवतो आणि साधकांना सेवेला बोलावतो. त्याने काही साधकांना प्रचार करायला सांगून स्वतःच्या प्रवचनांचे आयोजन केले.

पितृपक्षाच्या काळात त्याने काही साधकांना एकत्रित बोलावून ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करून घेतला. शेवटच्या दिवशी अन्य काही साधकांना भंडार्‍यासाठी बोलावले. या सर्व कृती त्याने उत्तरदायी साधकांना न विचारता मनानेच केल्या आणि साधकांच्या गुरुसेवेत व्यत्यय आणला.

२. स्वतःची गुणवैशिष्ट्ये दैनिकात छापून यावीत, यासाठी प्रयत्न करणे

या कार्यकर्त्याने साधकांना सांगितले, ‘‘मला एका साधकाचा भ्रमणभाष आला होता. त्या साधकाने मला सांगितले, ‘‘सर्वांचे वाढदिवस होत असतात. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमची गुणवैशिष्ट्ये साधकांकडून लिहून घ्या आणि ती पाठवून द्या. नंतर ती दैनिकात छापून येतील.’’

३. साधकांशी बोलतांना स्वकौतुक करणे

हा कार्यकर्ता काही साधकांना सांगतो, ‘मला अनेक संतांचे भ्रमणभाष येत असतात.’

४. संतांच्या नावाने असत्य माहिती पसरवून प्रौढी मिरवणे

अ. हा कार्यकर्ता सर्वांना सांगतो की, मला एका संतांनी सांगितलेे आहे, ‘तुम्हाला एके ठिकाणी बंगला बांधून देतो. तुम्ही दोघे तेथे रहा.’

सनातन संस्था त्यागावर आधारित साधना करण्याची शिकवण देत असल्याने संस्थेकडून साधकांना कुठलीच प्रलोभने दाखवली जात नाहीत. असे असतांनाही संतांच्या नावाने असत्य माहिती पसरवून हा कार्यकर्ता महापाप करत आहे !

आ. एकदा रामनाथी आश्रमातून या कार्यकर्त्याच्या जिल्ह्यात एक साधक जात होता. तेव्हा या कार्यकर्त्याने तेथील साधकांना सांगितले, ‘‘एका संतांनी त्या साधकाला सांगितले आहे, ‘माझी भेट घेऊन विचारपूस करा.’’ (प्रत्यक्षात संत म्हणाले होते, ‘‘जिल्ह्यात गेल्यावर या कार्यकर्त्याची भेट होईलच.’’)

इ. ‘साहित्य वितरणाची घडी बसावी; म्हणून माझी आणि एका संतांची बैठक झाली’, असे त्याने साधकांना सांगितले.

५. साधनेविषयी विकल्प पसरवणे

अ. ‘उदबत्ती आणि कापूर यांचे उपाय करायला गुरुदेवांनी सांगितलेले नाही’, असे तो साधकांना सांगतो.

आ. या कार्यकर्त्याने एका साधिकेच्या मुलाला सांगितले, ‘‘सनातनमध्ये जाऊन काहीही उपयोग नाही. आपण वैयक्तिक स्तरावर साधना करू शकत नाही का ?’’

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून अनेकांना विविध अनुभूती आल्या आहेत. त्यामुळे आनंदप्राप्तीच्या दिशेने त्यांचे मार्गक्रमण चालू आहे. सनातनचे धर्मप्रसाराचे कार्य देश-विदेशांत जोमाने पसरत आहे. संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून ७५ साधक संत झाले आहेत, तर १,१११ साधक ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठून संतत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. असे असतांनाही ‘सनातनमध्ये जाऊन काय उपयोग ?’, असे इतरांना सांगून त्यांना साधनेपासून परावृत्त करणे, यापेक्षा कुठले महापाप असेल ? सनातनची शिकवण चुकीची असती, तर शेकडो साधकांनी साधनेत प्रगती कशी केली असती ?

समष्टी सेवा करणार्‍या साधकांचा सेवेतील वेळ वाया घालवून आणि सनातनविषयी इतरांचे मत कलुषित करून स्वतःची प्रौढी मिरवण्यासाठी संतांच्याच नावाचा वापर करून या कार्यकर्त्याने अक्षम्य अपराध केलेला आहे !

कोणत्याही कार्यकर्त्याच्या संदर्भात या आणि अशा प्रकारच्या गंभीर चुका घडत असल्याचे लक्षात आल्यास साधकांनी त्या त्वरित रामनाथी आश्रमात [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवाव्यात किंवा पोस्टाने पाठवाव्यात अन् संबंधित प्रसारसेवकांनाही कळवाव्यात.’

(टपालासाठी पत्ता : श्री. महावीर श्रीश्रीमाळ, ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now