महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील ईश्‍वरप्राप्तीसाठी संगीत (गायन), वादन आणि नृत्य या कलांचा अभ्यास अन् त्याविषयीचे संशोधनकार्य यांत सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

हिंदु धर्मात सांगितलेल्या १४ विद्या आणि ६४ कला ही हिंदु धर्माने विश्‍वाला दिलेली अनमोल देणगी आहे. या विद्या आणि कला मनुष्यास आंतरिक सुख, समाधान, ऐहिक उत्कर्ष तर प्राप्त करून देतातच; परंतु त्यांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या माध्यमातून साधना करून व्यक्तीला ईश्‍वरप्राप्ती करून घेता येते; मात्र सद्यस्थितीत या विद्या अन् कला यांपैकी बहुतांश लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि ज्या काही प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यांची जीवनाभिमुखता अन् ईश्‍वरप्राप्ती हा त्यांचा मूळ उद्देश यांपासून त्या पुष्कळ दूर गेल्याचे आढळत आहे. या पार्श्‍वभूमीवर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी स्थापन केलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात या विद्या आणि कला यांचा अधिकाधिक अभ्यास अन् संपूर्ण मानवजातीस उपयुक्त होण्याच्या दृष्टीने त्यांविषयी संशोधन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे या शाखांचे आपोआप जतन होईल. त्याचसह ज्यांना विविध कलांच्या, उदा. चित्रकला, शिल्पकला, अक्षरयोग इत्यादींच्या माध्यमांतून साधना करावयाची असेल, त्यांना ते विषय शिकवले जातील.

६४ कलांपैकीच संगीत (गायन), वादन आणि नृत्य या कला आहेत. या कलांचा उपरोल्लेखित उद्देशांनी अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी त्यासंबंधीची आवड असणार्‍या अन् या कलांचे रीतसर शिक्षण घेतलेल्या व्यक्ती; स्वतः शिक्षण न घेतलेल्या; पण या कलांमधील अधिकारी व्यक्तींचे साहाय्य मिळवून देऊ शकणार्‍या व्यक्ती; तसेच संगीत (गायन), वाद्य आणि विविध नृत्यशैली यांची वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक माहिती देणारी पुस्तके, कात्रणे, लिखाण; यांसमवेत शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य यांच्या ध्वनीफिती, ध्वनी-चित्रचकत्या, रेकॉर्ड डिस्क आपल्याकडे उपलब्ध असल्यास, तसेच संगीत-नृत्य यांच्या माध्यमातून रोगांवर उपचार (म्युझिक थेरपी) याविषयीही काही तात्त्विक आणि प्रायोगिक माहिती असल्यास कु. तेजल पात्रीकर यांना पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.

भगवतीकृपा अपार्टमेंट्स, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.

भ्र.क्र. ९५६१५७४८२४, ७९७२४४८९०२

ई-मेल : [email protected]

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या विश्‍वकल्याणार्थ चालू असलेल्या ज्ञानयज्ञात साहाय्य करणार्‍यांची त्या साहाय्यातून एक प्रकारे साधनाच होणार आहे. आपण केलेल्या साहाय्याविषयी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय आपले नेहमीच कृतज्ञ राहील.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now