रांची येथे योगासने शिकवणार्‍या राफिया नाझ यांच्या घरावर धर्मांधांचे आक्रमण

भाजपच्या राज्यात धर्मांधांकडून धमकी मिळत असलेल्या एका तरुणीचे संरक्षण होऊ शकत नाही, हे सरकारला लज्जास्पद होय !

केरळमधील माकपच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अन् झारखंडमधील भाजपच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांची स्थिती एकच, असे कोणी म्हटल्याच चुकीचे ते काय ?

रांची (झारखंड) – येथे योगासने शिकवणार्‍या प्रसिद्ध योगशिक्षिका राफिया नाझ यांच्या घरावर १० नोव्हेंबरला धर्मांधांनी दगडफेक करून आक्रमण केले.

राफिया यांना धर्मांधांनी फतवा काढून योगशिक्षण देणे इस्लामच्या विरोधात असल्याने ते बंद करण्यास सांगितले होते. यानंतर धर्मांधांनी तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. या धमकीचे प्रकरण झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव संजयकुमार यांच्यापर्यंत नेण्यात आले होते. त्यानंतर नाझ यांच्या घराला संरक्षण पुरवण्यात आले होते; मात्र संरक्षणासाठी केवळ २ पोलीस होते. यांत एक महिला आणि एक पुरुष पोलीस होते. (ठार मारण्याची धमकी मिळालेल्या व्यक्तीला इतकी अल्प सुरक्षा पुरवून सरकार स्वतःचे दायित्व पूर्ण झाल्याचे समजत आहे का ? कोणतीही धमकी न मिळालेल्या राजकीय नेत्यांच्या संरक्षणासाठी मोठा फौजफाटा पुरवणारे पोलीस अशा संवेदनशील घटनेत इतके निष्काळजी कसे रहातात ? याला उत्तरदायी असणार्‍या पोलिसांना कारागृहातच डांबायला हवे ! – संपादक) रांचीतील डोरंडा भागात रहाणार्‍या राफिया नाझ योग शिकवून उपजीविका करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी योगऋषी रामदेवबाबा यांच्यासोबत व्यासपिठावरून योगासने सादर केले होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now