शाकाहारी, निर्व्यसनी विद्यार्थ्यांची ‘योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र शेलार सुवर्णपदका’साठी निवड होणार

पुणे विद्यापिठाचा अभिनंदनीय निर्णय !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतील विज्ञान विद्याशाखा आणि विज्ञानेतर विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी ‘योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उपाख्य शेलारमामा सुवर्णपदक’ देण्यात येते. या वर्षी हे सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी विद्यापिठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ‘शाकाहारी आणि निर्व्यसनी विद्यार्थ्यांची या पदकासाठी निवड करण्यात येईल’, असे अभिनव निकष जाहीर केले आहेत. (मांसाहारामुळे तमोगुण वाढत असून त्याचे अन्यही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर दुष्परिणाम होतात. मानवी शरीर हे शाकाहारालाच अनुकूल असल्याने सर्वच विद्यापिठांनी फुले विद्यापिठाचा आदर्श घ्यावा ! – संपादक)

सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी अनेक निकष देण्यात आले असून ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणार्‍या विद्यार्थ्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. विद्यार्थी भारतीय संस्कृती, आचार-विचार, परंपरांचे पालन करणारा असावा. त्याने गायन, नृत्य, वक्तृत्व, नाट्य आणि इतर कलांमध्ये प्राविण्य मिळवलेले असावे. रक्तदान, श्रमदान, पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण, साक्षरता-स्वच्छता मोहीम, एड्सविरोधी जनजागरण मोहिमेतही त्याने भाग घेतलेला पाहिजे. (विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य प्रयत्न ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF