पणजी, २४ जून (वार्ता.) – गोव्यातील प्रसिद्ध गायक कलाकार पंडित अजित कडकडे यांना २४ जून या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘गोमंत विभूषण’ याने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंडित अजित कडकडे यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.