पुणे शहरातील सिंहगड उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास २ महिने लागणार !

संग्रहित छायाचित्र

पुणे – नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने उड्डाणपुलाची उभारणी केली. या उड्डाणपुलाची म्हणजे राजाराम पुलाकडून धायरीकडे जाणारी बाजू खुली केली आहे; मात्र दुसर्‍या बाजूचे काम अर्धवट असून ते संथगतीने चालू आहे. काही ठिकाणी डांबरीकरण, खडी टाकणे काम चालू आहे. ते पूर्ण होण्यास अजून २ महिने लागतील, असे महापालिकेतील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.  पुलाचे काम पूर्ण करण्यास पावसाचा अडथळा येत असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे.