पुणे शहरातील वाहतूक कोंडीमुळे केंद्रीय मंत्री गडकरी यांचा दौरा रहित !

वाहतूक कोंडीवर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – शनिवारवाडा ते स्वारगेट यांच्यामधील प्रस्तावित असलेल्या भुयारी मार्गाच्या पहाणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा आयोजित केला होता. शहरातील वाहतूक कोंडीमुळे त्यांना पहाणीच्या ठिकाणापर्यंत पोचता आले नाही. परिणामी गडकरी यांनी दौरा रहित करून परत जावे लागले. त्यांनी गाडीतच अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. ‘पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याविषयी निवेदन देऊन लवकरच या संदर्भात बैठक घेऊ’, असे मंत्री गडकरी यांनी म्हटल्याचे भाजपचे आमदार रासने यांनी सांगितले.

आमदार हेमंत रासने म्हणाले की, पोलीस आणि महापालिका प्रशासन यांच्यातील समन्वया अभावी ही वाहतूक कोंडी झाली. नियोजनातील कमतरतेमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वाहतूक कोंडीमध्ये अडकले आणि त्यांचा दौरा रहित करावा लागला. (मंत्र्यांच्या दौर्‍याच्या वेळी पोलीस आणि महापालिका प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव होतो, तर एरव्ही काय होत असेल ? यासाठी शासनाने संबंधितांना कठोर शिक्षा देणे आवश्यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • वाहतूक कोंडीमुळे केंद्रीय मंत्र्यांना त्यांचा दौरा रहित करण्याची वेळ येणे दुर्दैवी !
  • शहरातील वाहतूक कोंडीविषयी मंत्र्यांना निवेदन देऊन बैठक घेण्याची वेळ का येते ? स्थानिक प्रशासनाला ही समस्या दिसत नाही का ? ‘स्मार्ट सिटी’मधील असे प्रशासन काय कामाचे ?