जालना येथील घटना !
जालना – जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी एका शेतकर्याला कर्ज द्यावे; म्हणून येथील एका बँक व्यवस्थापकाला दूरभाष करून धमकी आणि शिवीगाळ केली आहे. त्यांच्यातील या संवादाची कथित ऑडिओ क्लिप सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहे.
या प्रकरणानंतर आता बँक कर्मचारी संघटनाही आक्रमक झाली असून त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे आमदार कुचे यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. या संदर्भात आमदार कुचे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनेनी केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार कुचे यांनी ‘मी चांगल्या भाषेत तुम्हाला (बँक व्यवस्थापकाला) समजून सांगितले आहे. तुम्ही नाही ऐकले, तर मी हाताने समजून सांगतो’, अशी भाषा वापरली आहे.