ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, वारकरी संप्रदाय पाईक संघ, पंढरपूर

पंढरपूर – पालखी सोहळा आणि नमाज या दोन्ही गोष्टींचा वाहतूक कोंडीशी संबंध जोडणे हास्यस्पद आहे. पालखी सोहळ्यामध्ये सर्व कायदेशीर नियम पाळत वारकरी पंढरपूरला चालत जातात आणि त्यांचा मार्ग तोच आहे. गर्दीमुळे काही वेळा आपोआप रस्ता जाम होतो, तर दुसरीकडे नमाज पढण्यासाठी अनेक खुली ठिकाणे असतांनाही अवैधपणे जाणीवपूर्वक रस्त्यावर ठाण मांडून रस्ता जाम केला जातो.
हा मूलभूत फरक एका विधानसभा सदस्याला समजायला हवा, असे मत वारकरी संप्रदाय पाईक संघाचे ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर यांनी व्यक्त केले आहे.
या संदर्भात भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. प्राजक्ता बेणारे म्हणाल्या, ‘‘आझमी या व्यक्तीला प्रसिद्धीचा हव्यास आहे. हिंदु समाज कधीच मुसलमान समाजाच्या हजयात्रेवर किंवा अन्य धार्मिक गोष्टींवर टीका करत नाही. हिंदु नेहमी सहिष्णुता दाखवतात, हे आझमी यांनी विसरू नये. त्यांनी क्षमा मागावी अन्यथा ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल.’’