|
मुंबई – महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणी, तसेच भूसंपादन यांसाठी २० सहस्र कोटी रुपयांच्या प्रावधानास २४ जून या दिवशी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे या कामाला गती मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली.
या बैठकीत आदिवासी शासकीय वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता आणि आहार भत्ता यांत वाढ करणे, तसेच महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणार्या २ सहस्र कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी देणे, छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी रुपये देणे हे निर्णय घेण्यात आले.