संबंधितांशी चर्चेनंतर त्रिभाषा सूत्रावर अंतिम निर्णय ! – मुख्यमंत्री

मुंबई – त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतर संबंधित यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
संरक्षक भिंत कोसळून १४ दुचाकींची हानी !
कल्याण – येथील काटेमानिवली परिसरात नवीन इमारतीच्या बांधकाम साहित्याचा भार शेजारील योगेश्वर संकुलाच्या संरक्षक भिंतीवर येऊन २३ जूनच्या रात्री भिंत कोसळली. भिंतीलगतच्या १४ दुचाकी ढिगार्याखाली दबल्या गेल्या. या प्रकरणी योगेश्वर संकुलाच्या पदाधिकार्यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली आहे.