पी.एम्.पी.एम्.एल्.च्या भाडेवाढीमुळे उत्पन्न वाढले; पण प्रवाशांची संख्या घटली !

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाने (‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ने) भाडेवाढ केली होती. त्यामुळे उत्पन्न वाढले; पण प्रवासीसंख्येत घट झाली आहे. भाडेवाढ झाल्यापासून २ आठवड्यात १५ सहस्रांहून अधिक प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. मेमध्ये सरासरी १० लाख १४ सहस्र ७९३ प्रवाशांची संख्या होती. दिवसभराचे उत्पन्न १ कोटी ४२ लाख २९ सहस्र ६६४ रुपये होते. भाडेवाढ झाल्यापासून १ जून ते १५ जूनपर्यंत सरासरी ९ लाख ९९ सहस्र ८३० प्रवासीसंख्या आणि २ कोटी ११ लाख ८५ सहस्र ६४ रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती पी.एम्.पी.एल्. प्रशासनाने दिली. प्रवाशांना सुलभ सेवा देण्यासाठीही प्रयत्न करत असल्याचे सांगितले.