तुळजापूर अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई !

सोलापूर – तुळजापूर अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तामलवाडी पोलिसांनी अलीकडेच सोलापूर येथून भाजपचा कार्यकर्ता जीवन साळुंके याला अटक केली होती. त्यानंतर आता तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यालाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. अमली पदार्थ प्रकरणातील आरोपींची संख्या ३५ वर गेली असून यांपैकी २२ आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
१४ फेब्रुवारी या दिवशी तामलवाडी येथून ४५ ग्रॅम अमली पदार्थांसह तिघांना कह्यात घेतल्यानंतर अमली पदार्थांच्या व्यापाराचे मोठे जाळे उघड झाले होते. याचे धागेदोरे मुंबई, पुणेसह सोलापूरपर्यंत असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी अनेक प्रतिष्ठित मागील २ महिन्यांपासून पसार आहेत.