कंटेनरमध्ये गोमांस असल्याचा गोरक्षकांचा आरोप !

पुणे, २३ जून (वार्ता.) – पुणे- सोलापूर मार्गावरील उरुळीकांचन येथे २० जून या दिवशी ५ कंटेनर गोरक्षकांनी पकडून उरुळीकांचन पोलिसांच्या कह्यात दिले आहेत. यामध्ये गोमांस असल्याची शंका गोरक्षकांनी व्यक्त केली असून या मांसाची पडताळणी करून जर हे गोमांस असल्याचे निष्पन्न झाले, तर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोरक्षक अक्षय कांचन यांनी केली आहे. मांसाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
आम्ही तेलंगाणा राज्यातून हे मांस कंटेनरमध्ये भरले असून हे मांस मुंबई येथे निर्यातीसाठी चालले असल्याचे एका कंटेनरमधील चालकाने सांगितले. एका कंटेनरमध्ये २९ टन मांस असण्याची शक्यता आहे. म्हणजे अशा ५ कंटेनरमध्ये एकूण अनुमाने १४५ टन मांस असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाकिती दिवस पोलीस गोरक्षकांवर अवलंबून रहाणार ? पोलिसांनीही निष्पक्ष आणि वेगवान अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! |