‘बजरंग दल’ आणि ‘विश्व हिंदु परिषदे’च्या कार्यकर्त्यांचे यश !

बेलापूर (जिल्हा अहिल्यानगर) – येथील बाजारवेसजवळ उर्दू शाळेच्या पाठीमागे एका पत्र्याच्या खोपय्यामध्ये गोमांसाची विक्री करतांना शकील आयुब कुरेशी याला पकडले. त्याने शेजारील युसूफ शेख याच्या बेकरीमध्ये विक्रीसाठी आणलेले ५० किलो गोमांस जप्त करण्यात आले. बेलापूर पोलिसांनी त्या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. शकील कुरेशी याला अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशियांची कत्तल (वध) आणि गोमांस विक्रीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
बेलापूर येथील ‘बजरंग दला’च्या ‘गोरक्षक दला’च्या कार्यकर्त्यांना गोमांस विक्रीची माहिती मिळाली. त्यानुसार ‘बजरंग दल’ आणि ‘विश्व हिंदु परिषद’ यांचे कार्यकर्ते घटनास्थळी गेले. तेव्हा शकील गोमांस विकत असल्याचे दिसले. त्याची माहिती बेलापूर पोलिसांना देण्यात आली. तातडीने पोलिसांनी कारवाई करत शकील याला कह्यात घेतले. शेजारी युसूफ शेख याच्या बेकरीमध्ये ठेवण्यात आलेले ५० किलो गोमांस हस्तगत करण्यात आले.
बेकरीमध्ये गोमांस सापडल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या बेकरीतून नियमित बेकरी उत्पादने घेणार्या हिंदूंना आपण गोमांस खाल्ले काय ? गोमांसमिश्रित बेकरी उत्पादने सिद्ध केली जात होती काय ? अशा पद्धतीने बेकरीमध्ये गोमांसविक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे काय ? अशी भीती वाटत आहे. या घटनेमुळे हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्या आहेत.
ममदापूर येथे ७०० किलो गोमांस जप्त !
ममदापूर येथील पशूवधखान्यावर लोणी पोलिसांनी धाड घालून ७०० किलो गोमांस, ४ गोवंश, असा २ लाख ६० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शोएब कुरेशी, अब्दुल शेख, अब्दुल कुरेशी, मुनीर कुरेशी, शाकीब कुरेशी, साजीद कुरेशी, बकर शेख यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. कुरेशी मोहल्ल्यातील शोएब आणि यासीन शेख यांच्या घरामागील पत्र्याच्या खोपट्यावर कारवाई केली.
या कारवाईच्या १० दिवसांपूर्वीच या पशूवधगृहावर पोलिसांनी कारवाई केली होती. तरीही गोवंशियांची हत्या थांबत नाही ? पशूवधगृहे बंद होत नाही ? यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संपादकीय भूमिका
|