राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवला !

घटनास्थळाचे दृश्य

छत्रपती संभाजीनगर – येथील मुकुंदवाडी परिसरात संजयनगर येथील अतिक्रमण हटवण्याची कारवाई महापालिकेने केली. या कारवाईनंतर २२ जूनला पहाणी करत असतांना तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्याच वेळी तेथून जाणारा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा संतप्त नागरिकांनी अडवला होता.