
कल्याण – येथील रेल्वेस्थानकातून २ गांजा तस्करांना पोलिसांनी अटक केली. मेहताब शेख आणि लाल कोटकी अशी त्यांची नावे आहेत. यापैकी मेहताब हा मुंब्रा शीळ परिसरात रहातो, तर लाल हा कर्नाटकातील कुलबर्गी येथे रहातो. त्यांच्याकडून ४ लाख १७ सहस्र ३६० रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांच्याकडे मोठ्या आकाराच्या बॅगा पाहून पोलिसांना संशय आला होता. बॅगांच्या पडताळणीत त्यात गांजा असल्याचे उघड झाले.
संपादकीय भूमिकासमाजाला व्यसनाधीन करणार्या समाद्रोह्यांना कठोर शिक्षा हवी ! |