बांगलादेश : पैगंबर यांच्या कथित अवमानावरून मुसलमानांकडून हिंदु पिता-पुत्रांना मारहाण

  • पोलिसांकडून पिता-पुत्रांना अटक

  • मुसलमानांवर कोणतीही कारवाई नाही

पोलिसांकडून अटक करण्यात आलेले हिंदु पिता-पुत्र

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील लालमोनिरहाट जिल्ह्यात मुसलमानांच्या  जमावाने ६९ वर्षीय परेश चंद्र शील आणि त्यांचा ३५ वर्षीय मुलगा बिष्णु चंद्र शील यांच्यावर आक्रमण केले. परेश यांनी इस्लाम आणि महंमद पैगंबर यांच्याविरुद्ध कथित अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या दोघांना पोलिसांनी या प्रकरणावरून अटकही केली, तर त्यांना मारहाण करणार्‍यांवर कोणतीही कारवाई केली नाही.

परेश आणि बिष्णु हे दोघेही येथे केशकर्तनालय चालवतात. एका मुसलमान ग्राहकाने दावा केला की, परेश यांनी केशकर्तनालयात इस्लाम आणि पैगंबर यांचा अवमान केला. दुसर्‍या एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, त्यांनी परेश यांना महिन्याभरापूर्वीही असे बोलतांना ऐकले होते. यानंतर मुसलमानांच्या जमावाने केशकर्तनालयाबाहेर पोचून या दोघांना मारहाण केली. या घटनेचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारे हिंदूंवर खोटे आरोप करून त्यांच्यावर आक्रमणे केली जात आहेत आणि त्यांना वाचवणारे जगात कुणीच नाहीत ! भारतातही हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ काही केले नाही आणि काहीच वर्षांत येथेही असे घडू लागले, तर आश्‍चर्य वाटायला नको !