माजी आमदार आसिफ शेख यांना औरंगजेबप्रेमाचा पुळका !

मालेगाव – औरंगजेब ही पवित्र व्यक्ती होती. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले. ते सर्वधर्मसमभाव जपणारे आणि त्याप्रमाणे वागणारे होते; मात्र केवळ राजकारणासाठी त्यांना अपकीर्त केले जात आहे. आज त्यांच्या नावावर मत मिळवण्याचे आणि समाजात ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न चालूआहेत, हे योग्य नाही, असे विधान येथील माजी आमदार आसिफ शेख यांनी केले. ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’च्या वतीने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्र चिंतन शिबिरात ते बोलत होते. ‘औरंगजेब म्हणजे पवित्र व्यक्ती होती’, या विधानावर ठाम असल्याचेही आसिफ शेख म्हणाले.
संपादकीय भूमिकाऔरंगजेबाची खलनायकी कृत्ये, तसेच त्याचे क्रौर्य, त्याने हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार, हे संपूर्ण भारताला ठाऊक आहेत. असे असतांना औरंगजेबाचे समर्थन करू पहाणार्यांना भारतात रहाण्याचा काय अधिकार ? |