
तेहरान (इराण) – अणू केंद्रांवरील आक्रमणांमुळे युद्धभूमी उघडली गेली आहे. तुम्ही युद्ध चालू केले आहे, त्यामुळे आता तीव्र प्रत्युत्तरासाठी सिद्ध रहा. आम्ही हे युद्ध संपवू, अशी चेतावणी इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना दिली. इराणी सैन्याच्या प्रवक्त्याने या संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित करून ही चेतावणी दिली आहे.
१. इराणी सैन्याचे मेजर जनरल अब्दुलरहीम मौसावी यांनी म्हटले आहे की, इस्रायलला रोखण्याऐवजी अमेरिकेने आमच्यावर आक्रमण केले. असे करून अमेरिकेने इराणला त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी कोणतीही कारवाई करण्याचा पर्याय दिला आहे.
२. इराणी सैन्याचे नवे प्रमुख मेजर जनरल अमीर हतामी यांनी म्हटले की, आम्ही अमेरिकेचा सामना अनेक वेळा केला आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळाले आहे. या वेळीही आम्ही आनंदाने लढू.