OIC On Indus Waters Treaty : (म्हणे) ‘सिंधु जल करार रोखला जाऊ नये !’

५७ इस्लामी देशांच्या ‘इस्लामी सहकार्य संघटने’च्या बैठकीत आवाहन

इस्तंबूल (तुर्कीये) – येथे २२ जून या दिवशी झालेल्या ५७ इस्लामी देशांच्या ‘इस्लामी सहकार्य संघटने’च्या (‘ऑर्गनायझेन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या)  परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेत सिंधु जल करार, तसेच पाकिस्तान-भारत यांच्यातील द्विपक्षीय करार यांचे पालन करण्याचे या दोन्ही देशांना आवाहन करण्यात आले.

या संदर्भात प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण आशियात अलीकडच्या काळात झालेल्या सैन्य कारवाईविषयी आम्ही चिंतीत आहोत. भारताने पाकिस्तानात अनेक ठिकाणी आक्रमणे केली. आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगून आक्रमक भूमिका न घेण्याचे आवाहन करतो. तसेच सिंधु जल करार रोखला जाऊ नये. आधीसारखे या दोन्ही देशांनी कराराचे पालन करावे. आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, इस्लामी सहकार्य संघटनेचा प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार त्यांच्या मानवाधिकाराचे पूर्णपणे समर्थन करतो.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार या बैठकीत सहभागी झाले होते. डार यांच्यासमवेत पाकिस्तानी सैन्याचे फील्ड मार्शल असीम मुनीरही होते. मुनीर यांनी तुर्कीयेचे राष्ट्रपती रेसेप एर्दोगॉन यांची भेट घेतली.

संपादकीय भूमिका

‘पाकिस्तानने भारतात आतंकवादी कारवाया करू नये’, असे आवाहन इस्लामी संघटना का करत नाहीत ?