Pawan Kalyan Slams Bollywood : भारतीय संस्कृतीशी जोडलेले हिंदी चित्रपट सापडणे कठीण !

ज्येष्ठ तेलुगु अभिनेते तथा आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याकडून हिंदी चित्रपटसृष्टीचे (बॉलीवूडचे) खरे स्वरूप उघड !

ज्येष्ठ तेलुगु अभिनेते तथा आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण

अमरावती (आंध्रप्रदेश) – ज्येष्ठ तेलुगु चित्रपट अभिनेते आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत हिंदी चित्रपटसृष्टीविरुद्ध (बॉलीवूडविरुद्ध) अलीकडे केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ते म्हणाले की,

बॉलीवूड एक उद्योग बनला असून तो अधिक व्यवसायिक आणि ‘पैशांना समर्पित’ (ज्याचा केवळ पैसा कमावणे, इतकाच उद्देश आहे) झाला आहे. सध्या भारतीय परंपरेशी जोडलेले हिंदी चित्रपट सापडणे कठीण आहे. याच्या उलट दाक्षिणात्य चित्रपट भारतीय संस्कृतीशी अधिक प्रामाणिक आहेत असून या चित्रपटांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करण्याचा बॉलीवूडपेक्षा अधिक प्रयत्न सातत्याने केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत क्वचित्च असे चित्रपट बनवले जातात, जे परंपरांशी जोडलेले असतात.

संपादकीय भूमिका

बॉलीवूडच्या जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये अश्लीलता, बिभीत्सता, अनैतिकता आणि संस्कृतीहीनता ठासून भरलेली असते. भारतीय पिढी कशी व्यसनाधीन आणि नास्तिक बनेल, तसेच कुटुंबव्यवस्था कशी उद्ध्वस्त होईल, याची पुरेपूर काळजी या चित्रपटांमध्ये घेतलेली असते. हेच अभिनेते पवन कल्याण यांनी उघड केले आहे. त्यामुळे हिंदूंनी अशा बॉलीवूडवर बहिष्कार घालणे, हाच या समस्येवर उपाय आहे !