Netizens Slams Tommy Genesis : कॅनडातील भारतीय वंशाच्या गायिकेकडून कालीमातेसारखा वेश करून आणि हातात क्रॉस घेऊन अवमान

सामाजिक माध्यमांतून होत आहे विरोध

कॅनडातील भारतीय वंशाची ‘रॅपर’ टॉमी जेनेसिस

नवी देहली – कॅनडातील भारतीय वंशाची ‘रॅपर’ टॉमी जेनेसिस उपाख्य जेनेसिस यास्मिन मोहनराज हिचा ‘ट्रू ब्ल्यू’ हा  गाण्यांचा नवीन व्हिडिओ अल्बम नुकताच प्रदर्शित झाला. यात तिने कालीमाताचे रूप घेऊन ख्रिस्त्यांचे धार्मिक चिन्ह ‘क्रॉस’चा वापर केला आहे. यामुळे तिच्यावर सामाजिक माध्यमांतून प्रचंड टीका होत आहे.

१. टॉमी जेनेसिसने स्वतःला कालीमातेच्या रूपात दाखवण्यासाठी संपूर्ण शरिरावर निळा रंग लावला आहे. त्यावर सोन्याचे दागिने आणि गडद लाल रंगाची टिकली लावली आहे. तसेच हातात ‘क्रॉस’ धरला आहे. यात ती क्रॉसला चाटतांना दिसत आहे. हा क्रॉस  शरिरावर विविध ठिकाणी ठेवून विचित्र पद्धतीने ‘पोझ’ देतांना दिसत आहे.

कोण आहे टॉमी जेनेसिस ?

कॅनडातील भारतीय वंशाची ‘रॅपर’ टॉमी जेनेसिस

टॉमी जेनेसिसचे खरे नाव जेनेसिस यास्मिन मोहनराज असं आहे. तिचा जन्म कॅनडातील व्हँकुव्हर येथे झाला आहे. ती तमिळ आणि स्विडन पार्श्वभूमीची आहे. जेनेसिस तिच्या अश्लील शैलीतील गाण्यांसाठी ओळखली जाते. याआधीही तिने अशा गाण्यांचे व्हिडिओ प्रदर्शित केले आहेत. यामुळे तिला विरोध करण्यात आला आहे.

२. या प्रकरणी लोकांनी टीका करतांना ‘प्रसिद्धीसाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ नये’, असे म्हटले आहे. काही जणांनी ‘यु ट्यूब’वर तिच्या व्हिडिओ विरोधात तक्रार करणे चालू केले आहे. हे गाण लवकरात लवकर हटवण्याची मागणी केली जात आहे.

ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना भारतात शिक्षा होत नाही, तर कॅनडात तरी कुठे होणार ?