
छत्रपती संभाजीनगर – किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर सत्तूरने वार करून एका व्यक्तीची हत्या आणि दोघांना गंभीर घायाळ केल्याप्रकरणात अटकेतील धर्मांध आरोपी मस्तान उपाख्य नन्ना कुरेशी, समीर खान, बाबर शेख, साजिद कुरेशी उपाख्य सज्जू आणि नासिर खान यांना पोलिसांच्या चुकीमुळे जिल्हा अन् सत्र न्यायालयात जामीन मिळाला. त्यानंतर पोलिसांनी जामिनावर सुटलेल्या आरोपींना तात्काळ सातारा येथील दरोडा प्रकरणी गुन्ह्यात अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.व्ही. मुसळे यांनी आरोपींना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींची अटक कायदेशीर असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.