हरदोई (उत्तरप्रदेश) येथे पेट्रोल पंप कर्मचारी रजनीश याला मुसलमान युवतीने जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण

हरदोई (उत्तरप्रदेश) – येथे अरिबा खान नावाच्या एका युवतीने पेट्रोल पंपवरील एक कर्मचारी रजनीश कुमार यांच्या छातीवर बंदूक रोखून त्यांना धमकावल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी अरिबा आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. यावरून आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अरिबा हिचे कौतुक करत त्यास ‘स्वसंरक्षणाचे पाऊल’ असे म्हटले आहे, तर काँग्रेसचे हरदोई जिल्हाध्यक्ष विक्रम पांडे यांनी तिला ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई सन्मान’ देऊन सन्मानित केले आहे. ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे नेतेही अरिबाच्या ‘शौर्या’चे कौतुक करत आहेत.
काय आहे प्रकरण ?
उत्तरप्रदेशातील हरदोई येथे १५ जून या दिवशी एहसान खान नावाची व्यक्ती, त्याची पत्नी हुस्नबानो आणि मुलगी अरिबा हे त्यांच्या चारचाकी गाडीत सी.एन्.जी. भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते. तेथील कर्मचारी रजनीश कुमार यांनी त्या तिघांना सुरक्षेच्या नियमांनुसार सी.एन्.जी. भरतांना गाडीच्या खाली उतरण्यास सांगितले. याला कुटुंबाने विरोध केला. या वादात अरिबा हिने तिच्या वडिलांची बंदूक काढून रजनीशच्या छातीवर रोखली आणि ‘मी तुला इतक्या वेळा गोळ्या घालीन की, तुझ्या कुटुंबातील सदस्यही तुला ओळखू शकणार नाहीत’, अशा भाषेत धमकावले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली.
यावरून पोलिसांनी अरिबा खान आणि तिचे आई-वडील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. पोलीस अधीक्षक नीरज जादौन म्हणाले की, अरिबा, एहसान खान आणि हुस्नबानो यांना कह्यात घेण्यात आले असून एहसान खानच्या नावावर असलेली नोंदणीकृत बंदूक आणि २५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
संपादकीय भूमिका
|