शेतकर्यांसाठी ठाकरे गटाचा नवा उपक्रम !
छत्रपती संभाजीनगर – ठाकरे गटाने शेतकर्यांच्या पीक कर्जासाठी नवा उपक्रम घोषित केला आहे. मराठवाड्यात २३ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ‘बँकांची शाळा’ हा कार्यक्रम चालू होणार आहे. शेतकर्यांना पीक कर्ज नाकारणार्या बँकांना जाब विचारण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
बँका शेतकर्यांकडून थकबाकीची माहिती मागत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जापासून वंचित रहात आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप शेतकर्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने हा उपक्रम हाती घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह अनेक नेत्यांनी गावागावांतील शिवसैनिकांना शेतकर्यांसाठी लढण्याचे आवाहन केले आहे.