
आषाढी वारीसाठी २ ते ११ जुलै या कालावधीत कोल्हापूर विभागाकडून २७५ अतिरिक्त एस्.टी. बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या प्रत्येक आगारातून सोडण्यात येतील.
गावागावातून थेट पंढरपूर सेवा
४२ किंवा अधिक भाविक आगाऊ आरक्षण करतात, तर त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी आणि परतण्यासाठी विशेष बस उपलब्ध केली जाईल.
महिलांना ५० टक्के सवलत
महिला प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास
७५ वर्षांवरील भाविकांसाठी एस्.टी. ने विनामूल्य प्रवासाची सवलत लागू राहील.
भाविकांनी एस्.टी. सेवा वापरावी
राज्य परिवहन महामंडळाकडून भाविकांना एस. टी. सेवा वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.