वारीत संतांच्या अभंगांचे चुकीचे दाखले देऊन अपप्रचार करू नये !

ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांचे आवाहन

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना ह.भ.प. नितीन महाराज मोरे

पुणे, २० जून (वार्ता.) – पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला असून येथील गंभीर गोष्टींकडे आम्हाला सरकारचे लक्ष वेधायचे आहे. त्यामध्ये पालखीमार्गात मांस आणि मद्याची दुकाने चालू असतात, तर त्या कालावधीत ती दुकाने बंद असावीत. दिंडीमध्ये वारकरी आपल्या आचारधर्माचे पालन करतात, तसेच हिंदु धर्माचा प्रसार व्हावा, यासाठी प्रयत्न करतात; परंतु अन्य धर्मीय त्यांच्या धर्माची माहिती हिंदूंच्या संतांचे चुकीचे दाखले देऊन वारकर्‍यांना सांगतात आणि त्यांची दिशाभूल करत असतात. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे आवाहन श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी केले. ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलत होते.

ते म्हणाले की, पालखी मार्गावर मोठमोठ्या कमानी उभारणे, कर्णकर्कश आवाजात भोंग्यांवरून घोषणा देणे बंद करायला हवे. आमची दिंडी ही ‘प्लास्टिकमुक्त’ आहे, त्याप्रमाणे इतर दिंडीप्रमुखांनी पुढाकार घेऊन ‘प्लास्टिकमुक्त’ वारीसाठी पुढाकार घ्यावी.

संपादकीय भूमिका :

अपप्रचाराच्या माध्यमातून वारकर्‍यांची दिशाभूल करणार्‍या धर्मविरोधकांना वारीत येण्यास प्रतिबंधच करायला हवा !